मुंबई : विक्रोळी टागोरनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल दुरुस्तीसाठी 17 मे पासून स्थलांतरित करणार अशी माहिती मिळाल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. यासंदर्भात काँग्रेसचे ब्लॉक 118 चे अध्यक्ष राहुल वाघधरे यांनी महापालिका सहायक आयुक्तांना निवेदन दिले आहे. यात हॉस्पिटल स्थलांतरास विरोध केला असून ताबडतोब स्थलांतर थांबवावे, अशी मागणी राहुल वाघधरे यांनी केली आहे.
मृत व्यक्तीस शववाहिनी मिळेल पण विक्रोळीकरांना हॉस्पिटलची सेवा कधी मिळणार, अशी संतप्त प्रतिक्रिया राहुल वाघधरे यांनी काल दिली होती.
आज यासंदर्भात पालिकेला निवेदन देण्यात आले. यावेळी मुंबई काँग्रेस ब्लॉक क्र.११८ अध्यक्ष राहुल वाघधरे, ब्लॉक क्र. ११९ अध्यक्ष इम्रान खान, ईशान्य मुंबई जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. नितेश धामणे, मुंबई काँग्रेस लीगल, ह्युमन राईड आणि आ. टी. आई जिल्हा अध्यक्ष ॲड. रीतेश करकेरा,युवक काँग्रेस विक्रोळी तालुका अध्यक्ष आशिष कांबळे आणि मुलुंड युवक काँग्रेस महासचिव आदित्यजी गीते हे उपस्थित होते.