मुंबई : विक्रोळी पूर्वेतील रस्त्यांवर आता आबोली रंगातील रिक्षा धावणार असून त्यात प्रवाशांच्या सेवेसाठी महिला रिक्षाचालक असणार आहेत. छाया मोहीते, सुनिता गायकवाड, सुशिला माने, हेमांगी बेंद्रे, अनिता कर्डक या महिलांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली आहे.
मला मिळालेल्या रोजगाराबद्दल मी शिवसेनेचे आभार मानते, सुरुवातीला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आमचा प्रवासाचा टप्पा कमी असणार आहे, रिक्षाचालक छाया मोहीते यांनी सांगितले.
शिवसेना महाराष्ट्र रिक्षा चालक सेना आणि मातोश्री महिला बचत गट महासंघ यांनी या महिलांना आठ महिन्यांपासून रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण दिले. तसेच रिक्षा चालवण्यासाठी आवश्यक परवाने तसेच रिक्षा खरेदीसाठी कर्ज प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली होती.
या महिला रिक्षाचालकांचे मनोबल वाढावे, यासाठी दिशाग्रुप सामाजिक संस्थेने नुकताच त्यांच सत्कार केला. नगरसेवक उपेंद्र सावंत, दिनेश बैरीशेट्टी, राजन राणे, दिलीप साटम, राजेश सोनावणे यावेळी उपस्थित होते.