विक्रोळी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबईतल्या विक्रोळी
विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुढील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात
आल्या. मला पूर्ण विश्वास आहे की, ‘महाराष्ट्रातील सर्वात प्रबळ आणि प्रभावी विद्यार्थी संघटना’ अशी
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची ओळख निर्माण करण्यासाठी माझ्यासोबत तुम्ही सर्वजणही झपाटून काम
कराल, असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी व्यक्त केला.
प्रथमेश धुरी, दिप्ती वराडकर, वैभव पवार, विशाल कांबळे, श्रेया शेवाळे, प्रितम साबळे, ओमकार दर्गे, सुप्रिया केळुसकर, नितीन आवारी, गणेश चव्हाण, अल्पेश मेकडे, ममता सरवणकर, अक्षय मुळे, निशिता नार्वेकर, रोहन साळवी, महेश देढे यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने तसेच मनसे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार माझी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या विक्रोळी विधानसभा “विभाग सचिव” पदी नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल मी आभारी आहे.
तसेच माझे मार्गदर्शक सचिन मारुती मोरे, सहकारी म.न.वि.से. उपाध्यक्ष प्रशांत परूळेकर व म.न.वि.से. विक्रोळी विधानसभा विभाग अध्यक्ष प्रथमेश धुरी यांनी माझ्यावर विश्वास ठेवून जी जबाबदारी मला दिली त्याबद्दल धन्यवाद. माझ्या सर्व सहकाऱ्यांचे व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन, अशी प्रतिक्रिया विभाग सचिव विशाल कांबळे यांनी नियुक्तीनंतर दिली. विशाल कांबळे यांची निवड प्रभाग क्रमांक 121, 122, 123 साठी करण्यात आली आहे.