
विक्रोळी : कन्नमवार नगर येथे झालेल्या सहा लाखांच्या घरफोडीप्रकरणी विक्रोळी पोलिसानी आरोपीला अटक केली. पारस परमार(वय-२०) असे त्याचे नाव आहे. त्याला १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अवघ्या २४ तासांत चोरीची उकल केल्याने विक्रोळी पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
इमारत क्रमांक ६२ मध्ये तळमजल्यावर राहणाऱ्या चंद्रकांत घोक्षे यांच्या घरी शनिवारी ता. (२५) घरफोडी झाली होती. कल्याणला राहत असलेल्या मुलीकडे काही कामानिमित्त ते कुटुंबासह गेले होते. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोराने त्यांच्या घरातून १९ तोळे ऐवज लुटला होता. यामुळे कन्नमवार नगरात एकच खळबळ उडाली होती.
विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय सांडभोर, लालासाहेब डाके, सुभाष सोनावणे, संदीप देवर्डे, आशिष मसुरकर, वामन जायभाये, निलेश ठाकूर यांच्या टीमने यशस्वी तपास केला















