
मुंबई : विक्रोळी पूर्व रेल्वे फलाट क्रमांक 4 जवळ सरकता जिना बांधण्यात यावा, अशी मागणी सक्षम महिला मंडळाच्या अध्यक्ष पूजा दळवी यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. यावेळी दिशा ग्रुपचे दिनेश बैरीशेट्टी आणि सहकारी व विक्रोळीकर उपस्थित होते.
सरकता जिना नसल्याने ब्रिज चढताना प्रवाशांची दमछाक होत आहे. शिवाय या ठिकाणी प्रसाधनगृह देखील नाही. याकडेही पूजा दळवी यांनी लक्ष वेधले.
विक्रोळी स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक ४ परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी जिना बसवून देण्यासाठी संबंधित रेल्वे अधिकारी,स्टेशन मास्टर आणि रेल्वे इंजिनियर यांना निवेदन दिले आणि लवकरात लवकर सरकते जिने (Escalator) कामाची सुरुवात करावी, अशी विनंती पूजा दळवी यांनी केली. अन्यथा १५ ऑगस्ट नंतर लोकशाही मार्गाने आंदोलन करू असे त्या म्हणाल्या.तसेच विक्रोळी रेल्वे स्टेशन पूर्व येथील नागरिकांनासाठी प्रसाधनगृह बांधून द्यावे अशी विनंती केली.















