उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
रत्नागिरी दि.30 : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज विविध विकास कामांचे भूमिपुजन केले. गावांमध्ये नागरी सुविधा उपलब्ध करणे , गावांमध्ये विकाम कामे करणे यासाठी आपण कटीबध्द आहोत. विकासाची कामे करीत असताना कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिले. नाखरे येथे श्री देव रामेश्वर मंदीर नाखरे सुशोभिकरण व अनुवंशिक कामे करणे या कामाचे भूमिपुजन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष राहुल पंडीत, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती तोडणकर, पंचायत समिती सदस्य सुनिल नावले आदि मान्यंवर तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
कसोप-तेलीवाडी-बनवाडी-भंडारवाडी ते ग्रा. मा. 14 ला मिळणारा रस्ता डांबरी नुतनीकरण करणे, श्री देव रामेश्वर मंदीर नाखरे सुशोभिकरण व अनुवंशिक कामे करणे, मावळंगे महाकाली रस्ता तयार करणे, शिवार आंबेरे मेन रोड ते पाटीलवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या कामांचे भुमीपूजन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले















