मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती केली असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज केली.
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे विरोधी पक्षनेते पद रिक्त होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री. वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेत्याच्या आसनावर बसवून त्यांचे अभिनंदन केले. तसेच वडेट्टीवार यांच्या कारकिर्दीचा सविस्तर आढावा घेऊन त्यांना या पदासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, आमदार बाळासाहेब थोरात, अजित पवार, गणपतराव देशमुख, एकनाथ खडसे, अबू आजमी यांनीही त्यांच्या पक्षाच्या वतीने वडेट्टीवार यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.