नाशिक : ट्रिपल महाराष्ट्र केसरी, पुणे ग्रामीण प्रशिक्षनार्थी पोलीस उप अधिक्षक विजय चौधरी, पैलवान नथु चौधरी यांचे चिरंजीव यांचा साखरपुडा नाशिक येथील उद्योगपती प्रकाश भागवत यांची कन्या कोमल हिच्याशी धनदाई बँकवेट हॉल, पंचवटी येथे पार पडला. नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनीही या कार्यक्रमास विशेष उपस्थिती दाखवली. नाशिक पोलीसच्या डी.सी.पी. माधुरी कांगणे, योगेश चव्हाण, अपर पोलिस अधीक्षक, पालघर तसेच कुस्ती क्षेत्रातील हिंद केसरी रोहित पटेल, महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे, महेश मोहोळ, पंकज हारपुडे महाराष्ट्रातील कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थीत होते.