
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथील भुतेवाडीतल्या एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवनदान देण्यात वनविभागाला यश आले. बिबट्या विहिरीत पडला असल्याची बातमी हाहा म्हणता पंचक्रोशीत पसरली आणि बिबट्याला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली.बिबट्या विहीरीत पडल्याची माहिती तातडीने वनविभागाला दिली.माहिती मिळताच वनविभागााचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनक्षेत्रपाल र. शं. कांबळे, वनपाल गुरव पाटील, उपरे तसेच वनरक्षक परमेश्वर डोईफोडे, मिताली कुबल, गावडे, गुंठे, गोसावी हे कर्मचारी पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. विहीरीला कठडा नसल्याने आणि जवळपास ४० फुट खोल विहीर असल्यानं बिबट्याला खालूूून वर कााढणं जिकीरीचं झालं होतं. मात्र वनविभागाने मोठ्या शिताफीने पिंजरा विहीरीत सोडला.त्यांनतर अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं.हा बिबट्या नर असून त्याचं वय अंदाजे २ वर्ष आहे. या बिबट्याची उंची ६४ मी असून लांबी १४७ सेंमी आहे.. या बिबट्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. भक्षाचा पाठलाग करताना हा बिबट्या विहीरीत पडला असावा असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
















