रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): महाराष्ट्र सरकारच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या मार्फत विद्युत सुरक्षेसंदर्भात जनतेमध्ये जनजागृती व्हावी रॅली काढण्यात आली.
या विभागामार्फत ११ ते १७ जानेवारी २०१८ पर्यंत विद्युत सुरक्षा सप्ताह पाळण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून हि रॅली काढण्यात आली. यामध्ये ऊर्जा विभागाचे कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि रत्नागिरीकर मोठ्या संख्येने झाले होते.
यावेळी विद्युत सुरक्षेसंदर्भात महत्वाच्या घोषणा देण्यात आल्या. विद्युत वायर्स, केबल्स व विद्युत उपकरणे आय एस आय प्रमाणित योग्य क्षमतेचे वापरा, विद्युत सर्किटवर क्षमतेपेक्षा जास्त भार टाकू नका, इलेक्ट्रिक शॉकचा धोका टाळण्याकरीता इ.एल.सी.बी लावा, तात्पुरते लोंबकळते वायर्स लावू नका, योग्य पद्धतीचा अवलंब करा. जोडणी दिलेले वायर्स केबल्स वापरू नका अशा जनजागृतीविषयक घोषणा या रॅलीतून देण्यात आल्या.