मुंबई : शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिक्षा करतील याचा नेम नाही, विक्रोळी या उपनगरात तर एका शिक्षकाने विकृती दाखवत ३० विद्यार्थ्यांचे केस वाकडे तिकडे कापून त्यांना विद्रुप करण्याचा प्रकार केला आहे. केस कापण्याच्या प्रयत्नात दोन विद्यार्थ्यांच्या डोक्याला जखम झाली आहे. या प्रकरणी पीटी शिक्षक मिलिंद झनके, शिपाई तुषार गोरे यांना विक्रोळी पोलिसांनी अटक केली आहे.
टागोर नगर येथील बेरिस्टर बेरिस्टर नाथ पै शिक्षण प्रसारक मंडळाच्या केव्हीव्ही इंग्लिश हायस्कूलमध्ये शुक्रवारी ही घटना घडली. केस वाढले असे कारण सांगून इयत्त पाचवी ते आठवी इयत्तेमधील ३० विद्यार्थ्यांचे केस शाळेमध्येच कापण्यात आले. केसांभोवती कात्री फिरविण्यात आली.ही घटना पालकांना समजताच त्यांनी शाळेमध्ये जाब विचारला. यानंतर शिक्षकासह, शिपायावर कारवाई करण्यात आली.
शुक्रवारी सकाळी आठ च्या सुमारास शिक्षक झनके याने प्रत्येक वर्गात जाऊन ज्यांचे केस वाढले आहेत; अशा विद्यार्थांना त्याने वर्गाच्या बाहेर बोलवले आणि शिपाई गोरे याला केस कापण्यास सांगितले. गोरे याने कैची फिरवण्यास सुरुवात केली. यावेळी केस वाकडे तिकडे कापण्यात येऊन मुलांना विद्रुप करण्यात आले. महत्वाचे म्हणजे, यापैकी कोणाचेही केस वाढले नव्हते, सर्वांचे केस हे बारीकच होते.
“शाळेला केस कापण्याचा अधिकार कोणी दिला? संचालकांच्या सांगण्यावरून हा प्रकार झाला, असा आरोप पालक अमित पवार यांनी केला आहे.
प्रतिक्रिया
विद्यार्थ्यांचे केस अक्षरशः वाकडे तिकडे कापण्यात आले आहेत, ही विकृती आहे. आता मुलांचे टक्कल केल्याशिवाय पर्याय नाही. शिक्षक आणि शिपायाविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे- चेतन अहिरे, समाजसेवक
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
केस कापून वर्गात या, अशी ताकीद विद्यार्थ्यांना दिली होती. पण, आमच्या शिक्षकाला काय दुर्बुद्धी सुचली. शिक्षक आणि शिपायाविरोधात कारवाई करू – दशरथ बट्टा, संस्थापक, बेरिस्टर नाथ पै शिक्षण प्रसारक मंडळ