
कोल्हापूर :राजवाडा, इचलकरंजी येथे स्टुंडट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने विद्यार्थी संवाद पार पडला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काम करत असताना अभ्यासाला संघर्षाची जोड देण्याची गरज आहे. एसएफआयच्या वाढीसाठी विद्यार्थ्यांशी वैचारिक चर्चा महत्वाची आहे. हे वर्ष एसएफआय चे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचूयात. त्या दिशेने आपण वाटचाल करण्याचा संकल्प नवीन वर्षात करूयात, असे एसएफआय राज्य सचिवमंडळ सदस्य नवनाथ मोरे म्हणाले.
विद्यार्थी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढे आले पाहिजेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एसएफआय सातत्याने अग्रभागी राहिली आहे. मोठ्या संख्येने आपण विद्यार्थ्यांना सामिल करून घेऊन विद्यार्थी एकजूट उभारूयात. सर्वांना शिक्षण, सर्वांना काम चा नारा बुलंद करत. सरकारला शिक्षण आणि रोजगाराचा प्रश्न सोडविण्यास भाग पाडूयात, असे जिल्हाध्यक्ष पंकज खोत म्हणाले. स्वागत व प्रास्ताविक सौरभ जाधव यांनी केले.
यावेळी दर्शन लाडी, विशाल पोळ, शिवगोंडा हेगाजे, सौरभ कांबळे, स्वप्निल कदम, ऋषिकेश बडदरे, संकेत कत्ते, प्रणव थोरात, अद्वैत मनवाडे, ऋतिक पाटील, प्रज्ञेश भोसले आदीसह विद्यार्थी उपस्थित होते.















