मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर ) : शिवसेना प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या गोरगरिबांच्या मदतीचा केंद्रबिंदू असलेल्या सामाजिक काम करणाऱ्या व सर्व शिवसैनिक असलेल्या संस्थेद्वारे श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने ८०% समाजकारण व २०% राजकारण प्रोत्साहीत होऊन देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन कम्युनिटी सेंट्रल हॉल,सी.जी.एस.कॉलनी,घाटकोपर (प.) येथे विद्यार्थी गुण-गौरव सोहळा तसेच विद्यार्थी मार्गदर्शन सोहळा माजी केंद्रीय कॅबिनेट अवजड उद्योग मंत्री शिवसेना मा.खासदार अनंत गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र दगडू सकपाळ, महा.शिव माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष निलेश भोसले, शिवसेना विभाग संघटक अंधेरी (प.) मुंबई चे संजय कदम तसेच महा.शिव माथाडी कामगार सेना उपाध्यक्ष नागेंद्र राठोड उपस्थित होते. त्याचप्रमाणे मायेची सावली या संस्थेचेचे संस्थापक यशवंत खोपकर, संचालक अवी राऊत,अध्यक्ष रविंद्र जाधव, सचिव प्रमोद चौंडकर, खजिनदार गणेश काळे, सहसचिव सदाशिव लाड, सहखजिनदार राम वैद्य, विश्वनाथ जाधव,व कार्यकारिणी सदस्य संदिप चांदिवडे, बंडू चौधरी आणि कार्यालय प्रमुख विनायक जाधव व विश्वास तेली, संजय चव्हाण, घोलप साहेब, दौलत बेल्हेकर, शंकर तेली, हितेन गायकवाड़,दिलीप जाधव,तसेच गुणवंत विद्यार्थी,पालक व शिवसैनिक कार्यकर्ते हे या सोहळ्यास उपस्थित होते.