कोल्हापूर, 19 July : खचून न जाता विद्यार्थ्यांनी आपले मनोबल वाढवून आलेल्या प्रसंगाला सामोरे जावे, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले.
करवीर तालुक्यातील वाशी येथील बाबासो पाटील यांच्या घरी भेट देऊन त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले. यानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, झालेली घटना ही दुर्दैवी आहे. असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी १५-२० दिवसांत प्राचार्य आणि विद्यापीठातील संबंधितांशी चर्चा करुन निर्णय घेऊ. विद्यार्थ्यांनी कोणताही टोकाचा निर्णय घेताना आपल्या घरच्यांचा विचार करावा. आलेल्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी खचून न जाता मनोबल वाढवावे, असेही ते म्हणाले.