
( राष्ट्रवादी युवक तर्फे विद्यार्थ्यांना मदतीचा हात )
डोंबिवली, (प्रशांत जोशी) : कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक कुटुंब कोरोना काळात रोजगारापासून वंचित राहिले होते. परिणामी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांना पुस्तके,शालेय साहित्य घेऊन देणे ही गोष्ट कठीण होत होती. अशा विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे जिल्हा अध्यक्ष सुधीर वंडारशेठ पाटील यांच्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांची मदत केली जात आहे. त्याचाचा एक भाग म्हणून श्री सिद्धिविनायक न्यास ट्रस्टने विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
रविवारी पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात श्री सिद्धिविनायक ट्रस्टचे विश्वस्त सुनील पालवे यांच्या हस्ते पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच श्री सिद्धिविनायक न्यास ट्रस्ट ३१ जुलै २०२२ पर्यंत पुस्तकांचे वाटप करणार असून कल्याण डोंबिवली मधील विद्यार्थ्यांना गोळवली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात नोंदणी करावी असे आवाहन यावेळी राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष सुधीर वंडार पाटील सांगितले.
यावेळी श्री सिद्धिविनायक न्यास ट्रस्टचे विश्वस्त सुनील पालवे साहेब, ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष सुधीर वंडारशेठ पाटील, कल्याण डोंबिवली युवक जिल्हाध्यक्ष राज जोशी, युवक कार्याध्यक्ष विश्वास आव्हाड, जिल्हा उपाध्यक्ष मयूर गायकवाड, जिल्हा सरचिटणीस सुनील बोरनाक, ग्रामपंचायत सदस्य कैलास शेंद्रे, युवक वॉर्ड अध्यक्ष विकास पारधी आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.















