मुंबई: विक्रोळी येथील विद्या विकास एज्युकेशन सोसायटी संचालित विकास हायस्कूल टेक्नीकल विभागाचा निकाल १००% लागला. तसेच विक्रोळीतील विकास हायस्कूलचा निकाल ९५.७४ % लागला असून कु. पायल राजाराम पाटील या विद्यार्थिनीने ९४.२०% गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळविला. माध्यमिक शाळा वांगणी या ग्रामीण भागात असलेल्या शाळेचा निकाल ८३.३३% लागला असून कु.नेहा यशवंत विशे या विद्यार्थिनीने ९४.६०% गुण मिळवून शाळेत प्रथम आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय इंग्रजी माध्यमाचा ९८.८४ % निकाल लागला असून कु. अनुष्का दीपक मांढरे या विद्यार्थिनीने ९५.२०% गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला. तसेच विकास रात्रशाळा विक्रोळीचा निकाल ५८.८२% तर विद्या विकास नाईट हायस्कूल चा निकाल ७५% लागला आहे.
स्वामी शामानंद एज्युकेशन सोसायटी, घाटकोपरच्या स्वामी शामानंद हायस्कूलचा निकाल ९७.३६% लागला असून निकिता भारत कांबळे ९१.२%गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक मिळविला आहे. स्वामी शामानंद नाईट हायस्कूलचा निकाल ३० % लागला आहे. या दोन्ही एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे, मुख्याध्यापक व शिक्षकांचे संचालक प. म. राऊत यांच्याकडून हार्दिक अभिनंद करण्यात आले व विद्यार्थ्याच्या पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.