रत्नागिरी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणूकिसाठी एकूण १६ मतदान केंद्र कायम करण्यात आली आहेत. यातील ८ केंद्र हि रायगडमध्ये, रत्नागिरीमध्ये 5 तर सिंधुदुर्गमध्ये ३ केंद्र आहेत.
स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या कोकण विभागाची निवडणूक यावेळी अटीतटीची होण्याची शक्यता आहे. हि निवडणूक थेट शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये होणार असली, तरी या निवडणुकीत नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाची मतंही निर्णायक ठरणार आहेत. दरम्यान आज प्रशासनाकडून या निवडणुकीसाठी १६ मतदान केंद्र जाहीर करण्यात आली आहे. यातली रायगडमध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय पनवेल, कर्जत, पेण, अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, माणगाव, महाड हि ८ केंद्र आहेत. तर रत्नागिरीमध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय दापोली, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर आणि सिंधुदुर्गमध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या ठिकाणी मतदान केंद्र असणार आहेत.दरम्यान मतदान केंद्राची अंतिम यादी आज रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयाच्या जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, नगरपंचायत कार्यालये तसेच सर्व मतदान केंद्रावर प्रसिध्दी करणेत आलेली आहे, असं जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी रत्नागिरी यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.