नवी दिल्ली :एम. व्यंकय्या नायडू यांची देशाचे १३ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार असलेल्या नायडू यांनी मोठया मताधिक्क्याने विजय मिळवला. त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांचा पराभव केला. या निवडणुकीसाठी एकूण ७७१ लोकप्रतिनिधींनी मतदान केले. नायडू यांना ५१६ तर गांधी यांना २४४ मते मिळाली. ११ मते बाद झाली.
उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम. व्यंकय्या नायडू यांचे अभिनंदन केले आहे. भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्याबद्दल एम. व्यंकय्या नायडू यांचे अभिनंदन. यशस्वी आणि प्रेरणादायी कारकीर्दीसाठी त्यांना, माझ्या शुभेच्छा, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. नायडू यांच्यासमवेत पक्षात आणि सरकारमध्ये केलेल्या आठवणीनी माझे मन भरून आले आहे.
राष्ट्र उभारणीच्या उद्दिष्टासाठी कटिबद्ध राहून, दक्ष आणि समर्पित उपराष्ट्रपती म्हणून एम व्यंकय्या नायडू, राष्ट्राची सेवा करतील असा मला विश्वास आहे, असे पंतप्रधान म्हणाले आहेत.