मुंबई : भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज दादर चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी “त्रिशरण पंचशील” म्हणण्यात आले.
याप्रसंगी राज्यपाल चे. विद्यासागर राव, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, चैत्यभूमी येथील भन्ते बी. संघपाल, चैत्यभूमी स्मारक समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, अविनाश महातेकर, काकासाहेब खंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपराष्ट्रपतींना चैत्यभूमी स्मारक समितीच्यावतीने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तक भेट दिले