२०१९ मध्ये ६३ स्टार्टअप्समध्ये केली ५०० कोटींची गुंतवणूक
मुंबई : आशियातील पहिल्या तीनपैकी एक असणारे व देशातील पहिले आणि सर्वात मोठे इंटिग्रेटेड इनक्यूबेटर व्हेंचर कॅटालिस्टने २०१९ मध्ये ६३ स्टार्टअप्समध्ये ५०० कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. व्हेंचर कॅटालिस्ट हे भारताचे पहिले एकात्मिक इनक्यूबेटर आहे जे दीर्घ कालावधीसाठी कायमस्वरुपी संपत्ती मूल्य तयार करण्याची क्षमता असणा-या आरंभिक टप्प्यातील स्टार्टअप्समध्ये २,५०,००० डॉलर ते १५ लाख डॉलरची गुंतवणूक करतात. २०१६ पासून, २७ शहरांमधील १४,००० हून अधिक स्टार्ट-अप्स योग्य मार्गदर्शनासाठी आणि उद्योजक प्रशिक्षण मिळवण्यासाठी व्हेंचर कॅटालिस्ट्सकडे पोहोचले आहेत.
टिअर २ आणि टिअर ३ शहरांमध्ये पसरलेल्या ५००० हून अधिक एंजेल्सच्या विशाल नेटवर्कसह मंचाने आतापर्यंत १७१ सौदे पूर्ण केले आहेत ज्याच्या पोर्टफोलिओ गुंतवणूकीचे मूल्यांकन १.७ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे.
व्हेंचर कॅटालिस्टचे अध्यक्ष व सह-संस्थापक डॉ. अपूर्व रंजन शर्मा म्हणाले, “व्हेंचर कॅटालिस्ट्सने लहान शहरातील हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युल्स (एचएनआय) मधील गुंतवणूकीची शक्यता ओळखली जे काही वर्षांपूर्वी केवळ स्टॉक मार्केट्स आणि रिअल इस्टेटमध्येच गुंतवणूक करीत होते.परंतु, २००८ च्या सब-प्राइम संकटानंतर गुंतवणूकदारांची ही श्रेणी मालमत्तेचा नवीन वर्ग शोधत होती जी त्यांना गुंतवणुकीचा चांगला परतावा देऊ शकेल.”