‘पुणे रॅप’ ला मिळालेल्या यशानंतर रॅपर श्रेयश जाधव एक नवेकोरे रॅपसॉंग प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित ‘वीर मराठे’ हे हटके गाणे त्याने तयार केले आहे. १५ मार्चला तिथीनुसार साजरी झालेल्या शिवजयंतीनिमित्ता या गाण्याचा पहिला टिजर पोस्टर रसिकांसाठी प्रदर्शित केला गेला. शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या स्तुतीपर गायलेले हे पहिलेच रॅपसॉंग आहे. या गाण्याद्वारे तो शिवरायांना मानवंदना देणार आहे.
एव्हरेस्ट इंटरटेनमेन्ट आणि गणराज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली प्रसिद्ध होणारे ‘वीर मराठा’ या रॅप गाण्याला हर्ष, करण आणि अदित्य यांनी ताल दिला आहे. सुजित कुमार यांनी या गाण्याचे दिग्दर्शन आणि कॉरियोग्राफी केली आहे या गाण्याचे बोल आणि रॅप स्वतः श्रेयश ने लिहिले आणि गायले आहे. प्रत्येक मराठी माणसाला स्फुरण देणारे ‘वीर मराठे’ हे रॅपसॉंग प्रचंड लोकप्रियता मिळवेल, असा विश्वासही या निमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे.