उरण : रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालय महालण विभाग फुंडे येथे दिनांक 23 जुलै 2022 रोजी महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेल व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयसीआयसीआय व एन आय आय टी तर्फे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांसाठी सेमिनार व नोकर भरतीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयक्यूएसी चे प्रमुख डॉ.आर बी पाटील यांनी केले , तर पाहुण्यांची ओळख प्लेसमेंट सेलचे चेअरमन डॉ. आमोद ठक्कर यांनी केले. आय सी आय सी आय- एन आय आय टी चे रिजनल मॅनेजर श्री निरंजन मोहिते यांनी उपस्थित सर्व इच्छुक उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्यासाठी आवश्यक असणारी गुणवत्ता म्हणजेच पदवी, इच्छाशक्ती ,प्रामाणिकपणा तसेच आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देणे म्हणजे संभाषण शास्त्र इतकं जमल्यास बँकिंग मध्ये प्रचंड वाव आहे असे सांगितले. बॅंकिंग क्षेत्रात इतरही अनेक विभाग जिथे अगदी फ्रेशर ने सुरुवात करून मोठ्या पदावर जाऊ शकता असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले .त्याचबरोबर मुलाखत देण्यासाठी कशी तयारी करावी या विषयावरही विस्तृत विवेचन केले. आय सी आय सी आय- एन आय आय टी चे डेप्यूटी मॅनेजर आशिष राऊत हे उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले तसेच विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक मुलाखती घेतल्या. या उपक्रमात सुमारे 108 इच्छुक उमेदवार उपस्थित होते. प्रत्यक्ष मुलाखतीतून त्यांचे कल व आवड लक्षात घेऊन व त्यांचे शैक्षणिक गुणवत्ताही लक्षात घेऊन प्रत्यक्षात 33 विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली या परीक्षेतून निवड झालेल्या योग्य उमेदवारांना तीन आठवड्यांचे प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष नेमणूक देण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या कार्यक्रमासाठी आयसीआयसीआय- एन आय आय टीच्या सिद्धी दिवेकर यांनी विशेष प्रयत्न केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉ.पी जी पवार यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती करून दिली आय सी आय सी आय एन आय आय टी टीमने इथून पुढे असेच सहकार्य करावे असे आवाहन केल. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. विलास महाले यांनी केले. उमेदवारांच्या मुलाखती व लेखी परीक्षेचे नियोजन डॉ. झेलम झेंडे व प्रा.भूषण ठाकूर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीक्षिता म्हात्रे व प्रांजल भोईर यांनी केले.















