
उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा चेअरमन प्रशांत यादव यांच्या हस्ते गौरव
चिपळूण : वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. या प्रकल्पात बुधवारी सकाळी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डेअरीतील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, संचालक महेश खेतले, अविनाश गुडेकर, प्रशांत वाजे, डेअरीचे जनरल मॅनेजर लक्ष्मण खरात, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराव देसाई, डेअरीचे मार्केटिंग मॅनेजर तानाजी निंबाळकर यांच्यासह डेअरीचे इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रशांत यादव आणि स्वप्ना यादव यांनी कामगार दिनानिमित्त कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी प्रशांत यादव यांच्या हस्ते उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्यात किरण चाळके, अभिषेक कदम, रोहित शिंदे, ओंकार महाडिक, राहुल डुचे, सिद्धेश घोरपडे, साक्षी कदम यांचा समावेश आहे.

आमच्या दृष्टीने प्रत्येक कर्मचारी हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे वाशिष्ठी डेअरीच्या प्रगतीबरोबरच कर्मचाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी देखील आम्ही घेत आहोत आणि यापुढेही घेत राहू. प्रत्येकाने आपली जबाबदारी आणि आपले काम प्रामाणिकपणे करीत राहा. निश्चितच जस-जसा प्रकल्प मोठा होईल तशी प्रकल्पातील प्रत्येक कर्मचाऱ्याची प्रगतीही होत राहील, असे आश्वस्त करीत कर्मचाऱ्यांच्या बळावरच वाशिष्ठी डेअरीने अल्प कालावधीत मोठे यश मिळवले आहे, अशा शब्दांत प्रशांत यादव यांनी कर्मचाऱ्यांचा गौरव करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.