
- नवी मुंबईतील पहिल्या शॉपीचे कामोठे येथे शानदार उद्घाटन
- गृह राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते शुभारंभ
- वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती
चिपळूण : अल्पवधीतच संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेल्या मे. वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. या दुग्धप्रकल्पाने मुंबई व ठाणेपाठोपाठ नवी मुंबईतही शानदार एन्ट्री केली आहे. नवी मुंबईतील कामोठे येथे वाशिष्ठी डेअरीच्या शॉपीचे नुकतेच गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषधी प्रशासन राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन तसेच भाजप नेते प्रशांत यादव यांच्यासह नवी मुंबईतील प्रमुख मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी शॉपीचालक जमीर हसनमिया डवलकर आणि अरमान मुराद डवलकर यांना मान्यवरांनी नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.

कामोठे येथील अक्षर बिल्डिंग, गाळा क्रमांक २१, सिल्व्हर क्रेस्ट सीएचएस, भौमितिक प्लॉट क्रमांक २९, सेक्टर २५ येथे वाशिष्ठी डेअरीची शॉपी सुरू करण्यात आली आहे. या उद्घाटन समारंभाला शिवसेना कामोठे शहरप्रमुख सुनीलभाऊ गोवारी, वन लाईफ प्रा.लि.चे चेअरमन शाहीद शेख, बाबा बिल्डर्सचे धनंजयदादा पाटील, वन लाईफ प्रा. लि.च्या व्यवस्थापकीय संचालक सौ. शाहिस्ता खान, बुरोंडी मुंबई शिवसेना विभाग संघटक किरण नाचरे, शाहिदअली डिमटीकर, भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष समीर कदम, चिपळूण तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष योगेश शिर्के, वाशिष्ठी डेअरीचे व्यवस्थापक प्रदीप मगदूम यांच्यासह विनोद कदम, विलास कदम, इरफान दाभीळकर, अनिकेत मसुरे, सूर्यकांत मसुरे, चंद्रकांत मसुरे, शरीफ कोंडविलकर, रऊफ डिमटीकर, शादाब कोंडविलकर, शहबाज कोंडविलकर, सकलैन कोंडविलकर, शहजाद दाभीळकर, कामरान दाभीळकर, अमान पोशीलकर, मुनाफ डवलकर, शाहीद डिमटीकर, तजम्मूल डिमटीरकर, मोहसीन मुगुरूसकर, अलतमश कोंडविलकर आदी उपस्थित होते.

वाशिष्ठी डेअरीने यापूर्वी मुंबई, ठाणे परिसरात ठाणे, कळवा, डोंबिवली, दहिसर आणि घाटकोपर येथे वाशिष्ठी डेअरीची शॉपी सुरू केली आहे. नवी मुंबईत वाशिष्ठी डेअरीची शॉपी सुरू व्हावी, अशी मागणी होत होती. नवी मुंबईतील कामोठे परिसरात असणाऱ्या कोकणवासीयांना शॉपी सुरू झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या शॉपीमध्ये वाशिष्ठी डेअरीच्या दुधासह दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, तूप, सुगंधी दूध, बासुंदी आणि पेढा तसेच वेगवेगळ्या चवदार फ्लेव्हर्समधील आईस्क्रिम विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. दर्जेदार उत्पादनांमुळे वाशिष्ठी डेअरी आता मुंबईस्थित कोकणवासीयांमध्ये नावलौकीक मिळवत आहे. कामोठेत शॉपी सुरू झाल्यामुळे सर्वांनी समाधान व्यक्त केले.















