
रत्नागिरी : कोकणातील लोकप्रिय वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्सची शॉपी आता रत्नागिरीतही सुरू झाली असून, साळवी स्टॉप, नाचणे लिंक रोड येथे आज या शॉपीचा भव्य शुभारंभ झाला. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुभाषराव चव्हाण साहेब यांच्या प्रेरणेतून, आणि वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्सचे अध्यक्ष श्री. प्रशांत यादव साहेब, मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना प्रशांत यादव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. सचिन पालांडे आणि सौ. शुभ्रा पालांडे यांनी ही शॉपी सुरू केली आहे.. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री. राजेंद्र पटवर्धन, श्री. प्रकाश साळवी, श्री. प्रमोद साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ज्येष्ठ कामगार नेते श्री. सुधाकर सावंत यांच्या शुभ हस्ते फित कापून या शॉपीचं आज उद्घाटन झालं.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निवृत्त अधिकारी श्री. बशीर सय्यद, श्री. विलास बने, श्री. विलास सावंत, श्री. अनिल उपळेकर, श्री. दशरथ खेडेकर, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे अधिकारी श्री. संजय कुंभार यांच्यासह श्री. अरुण पाटणकर, श्री.दत्तात्रय केळकर, श्री.लीलाधर भडकमकर, श्री. विलास भोसले, श्री. संजय पालांडे, श्री. अमोल सावंत, श्री. मुन्ना थरवळ, श्री. संतोष बने, श्री. धोंडू करंबेळे, श्री. तेजस शिंदे, श्री. उदय गुजर, श्री. विश्वास जोशी, श्री. सुधाकर नाईक, श्री. पराग लाड, श्री. संजय साळवी, श्री. संतोष चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

दरम्यान शिवसेनेचे युवासेना जिल्हाध्यक्ष श्री. तुषार साळवी, श्री. दीपक पवार, श्री. दुर्गेश पांगम, यांच्यासह श्री. सागर लिंगायत, श्री. रमेश कनावजे, श्री. नंदकिशोर सावंत यांनीही शॉपीला भेट देत शुभेच्छा दिल्या.
शॉपीच्या उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांनी वाशिष्ठी डेअरीचे अनेक पदार्थ खरेदी केले. अनेक ग्राहकांनी यावेळी वाशिष्ठी डेअरीच्या उत्पादनांचं कौतुक केलं.. आईस्क्रीम, दूध, दही, श्रीखंड, आम्रखंड, ताक, गाई व म्हैस तूप, पनीर तसेच इतर दुग्धजन्य असंख्य पदार्थ वाशिष्ठीच्या या शॉपीमध्ये विक्रीस उपलब्ध करण्यात आले आहेत.















