मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा प्रश्न गंभीर आहे. मुंबई विद्यापीठाने परीक्षा मुल्यांकनाची पद्धत ऑनलाईन केली. ही प्रक्रीया टप्प्याटप्प्याने राबविण्याऐवजी एकाचवेळेस तीची अंमलबजावणी केल्याने प्रश्न पत्रिका तपासण्यास वेळ लागला. याबाबतीत शिक्षण मंत्र्यांकडून आपण माहिती घेतली असून 17 लाख प्रश्न पत्रिकांपैकी 14 लाख प्रश्न पत्रिकांची मुल्यांकन पूर्ण झाली आहे. मात्र एखाद्या विषयाची पूर्ण प्रश्न पत्रिकांची तपासणी झाल्याशिवाय त्या संबंधित विषयाचा निकाल लावता येत नाही. 171 परिक्षांचे निकाल लागले आहे. या विषयासंबंधी राज्यपालांनी कुलगुरु व अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या असून 5 ऑगस्टपर्यंत निकाल लावण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. कोणत्याही परिक्षांवर परिणाम होणार नाही. परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना 15 ऑगस्टपर्यंत निकाल देण्यात येतील. ऑनलाईन निकालाची पद्धत नवीन असून भविष्यात काळजी घेण्यात येईल.