सामाजिक कर्तव्यदक्ष म्हणून प्रतिनिधींचा झाला सन्मान
नालासोपारा (शांताराम गुडेकर )
साई छाया विद्यामंदिर मोरेगाव,नालासोपारा पूर्व येथे जनपहारा मराठी वृत्तपत्र आणि महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजचे १४ वे स्नेहसंभेलन थाटामाटात संपन्न झाले.लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे प्रसार माध्यम होय.या माध्यमच्यासहाय्याने विविध घटकातील नागरिकांना होणाऱ्या असुविधेच्या विरोधात उभे ठाकलेले महाराष्ट्रातील नामवंत मराठी वृत्तपत्र म्हणजेच जन पहारा आणि महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आहे.वर्धापन दिनाच्या सुरवातीला संपादक श्री.जितेंद्र शिंदे यांच्या सौभाग्यवती सौ.शुभांगी जितेंद्र शिंदे यांनी श्रीफळ पूजन करून श्री.राजू रिकामे सह संपादक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सुरवात करण्यात आली.उच्च न्यायालय येथील वकील श्री.दिनेश शिंदे यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.तर मराठी वृत्तपत्राचे जनक बालशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन श्री.श्रीकांत बिरवाडकर यांनी केले.प्रतिनिधी संदीप लाड, संजीव सुतार, सचिन चिपटे, तुषार मांडवकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाल सुरवात करण्यात आली. हा कार्यक्रम शिस्तने योग्य
नियोजनाने पार पडल्यामुळे उपस्थित सर्व मान्यवरांची मने जिंकली. यात महत्त्वाचे म्हणजे ज्या समाजसेवकानी समाजसेवेचे कार्य हाती घेऊ उल्लेखनीय कामगीरी केली अशा समाजसेवकांना “सामाजिक कर्तव्यदक्ष पुरस्कार-२०२२ “ने सन्मानित करण्यात आले. यामध्ये समाजसेवक, रुग्णसेवक, महाराष्ट्र पोलिस, नगरसेवक, सभापती, संघटना, तर काही फाउंडेशन यांचा ही प्रामुख्याने विचार करून त्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये मान्यवर म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिकारी जगन्नाथ चौघुले, समाजसेवक व उच्च न्यायालय कर्मचारी श्री.चंद्रकांत करंबेळे,साई छाया स्कुलचे संस्थापक डॉ.संजय जाधव, वकील श्री. दिनेश शिंदे, रेल्वे प्रवासी प्रगती मित्र मंडळ मान्यवर,साई एकदंत रहिवाशी सेवा संघ.शिवसेना पालघर जिल्ह्या प्रमुख श्री. पंकज देशमुख,मा.नगरसेवक किशोर पाटील, मा.सभापती निलेश देशमुख,मा.नगरसेवक श्री.अरुण जाधव श्री.रुग्णसेवक प्रदीप मोगरे, श्री.साईनाथ संजीवनी, तुकाराम पाष्टे अधिकारी संजीवनी हॉस्पिटल विरार,संतोष अगबुल प्रतिष्ठानचे संस्थापाक श्री.संतोष अगबुल, गुहागर प्रतिष्ठाण,सोमा गुडेकर, संतोष नागले,श्री.प्रभाकर कुडाळकर -ABP माझा, समाजसेवक किशोर भेरे, रायजीबाई धोंडु शिंदे प्रतिष्ठान श्री.अनंत पाटील समाजसेवक, कुणबी समाज मंडळ शिपोळे, शिव संभा प्रतिष्ठान, मा.राजेश चंद्रकांत पोरे (अखिल भारतीय जनहित पार्टी महाराष्ट्र उपाध्यक्ष), सौ.रुपाली नांदवीकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माजी नालासोपारा विधानसभा अध्यक्षा/समाजसेवीका, मा.अमित बबन चव्हाण बिंदास जिंदगी फाउंडेशन, कृष्णात दादासो पाटिल- अखिल भारतीय जनहित पार्टीचे संस्थापक /अध्यक्ष तसेच सौ.अल्पना प्रमोद सोनावणे (आशा की लहर या संस्थेतर्फे तृतीयपंथी समाजा साठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या),श्री.यशजी माने (हेलिकॉप्टर दादा म्हणुन ओळख असणारे तथा गरीब गरजु मुलांसाठी अहोरात्र मेहनत करणारे युवा प्रेरणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष),खबरे आजतक पत्रकार त्रिपाठी यांनी प्रामुख्याने उपस्थिती दिली.तर प्रत्येक प्रतिनिधीना उत्कृष्ट प्रतिसाद पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.विशेषतः या कार्यक्रमाला प्रतिनिधीचा कौटुंबिक मेळावा म्हणून मानले जात असताना भव्य दिव्य कार्यक्रमाची जबाबदारी प्रत्येक प्रतिनिधी स्वतः शिरावर घेऊन पार पाडली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसंपादक दिपक मांडवकर यांनी केले.तर संपादक श्री.जितेंद्र शिंदे यांनी प्रतिनिधी आणि मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.