मालाड,ता.27(वार्ताहर) : वंदे मातरम प्रतिष्ठानच्या वतीने 200 गरजू नागरिकांना मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले. दिनांक 26 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता स्वर्गीय सोनल बेन यांच्या स्मरणार्थ शैलेश नगर, ओरलेम टैंक रोड येथे हा उपक्रम राबविण्यात आला. चारकोपचे आमदार योगेश सागर आणि वॉर्ड क्रमांक 35 च्या भाजपा नगरसेविका सेजल देसाई आणि भाजपानेते आरयू सिंह तसेच विनोद शेलार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सुनील कोळी तसेच कार्यक्रमाचे आयोजन वंदे मातरम प्रतिष्ठान चे अध्यक्ष सुरेश मापारी यांनी केले होते.














