डोंबिवली, (प्रशांत जोशी) : मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे कामनिमित्त गेलेल्या कौस्तुभ व रोहन या वैद्य बंधूंचे अपहरण करून 1 कोटींची खंडणी मागण्यात आली होती. सोमवारी 6 ऑगस्ट रोजी त्यांची सुटका करण्यात आल्यानंतर ते आज शुक्रवारी मुंबईत दाखल झाले. त्यानंतर दुपारी दीड वाजता पोलिसांनी त्यांना सुखरूप डोंबिवलीत पोहोचवले.
वैद्य बंधूंचे काका राजू वैद्य यांनी आपल्या पुतण्यांचे अपहरण झाले व 1 कोटी खंडणी मागीतल्याची तकार डोंबिवली पोलीस व खंडणी विरोधी पथक ठाणे यांच्याकडे केली होती. यामुळे डोंबिवलीतील्ल त्यांचे नातेवाईक काळजीत होते.
कौस्तुभ आणि रोहन वैद्य बंधूंचा रॉक फ्रोजन फूडचा व्यवसाय असून ली फ्रोजन फूड्स बरोबर चर्चा करण्यासाठी ते क्वालालंपूरला गेले असता त्याचे अपहरण करण्यात आले होते. त्यांच्याकडून 1 कोटी खंडणी मागण्यात आल्याची तक्रार केली होती. अखेर 6 तारखेला दोघांना सोडून देण्यात आले. आज दुपारी मलेशियामार्गे मुंबईत दाखल झाल्यावर ठाणे गुन्हा शाखेने त्यांना दुपारी दीड वाजता घरी आणून सोडले.