रत्नागिरी: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार विनायक राऊत हे पुन्हा निवडून येणार ही काळ्या दगडावरील रेघ आहे. मात्र आपल्या गावतुन त्यांना जास्त मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले. शिवसेना सरपंच पाडवा मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते.
शिवसेना सरपंच उपसरपंच यांना पाडवा मेळावा येथील खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेना जिल्हाध्यक्ष तथा आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी शिवसेना भाजपा रिपाई महायुतीचे उमेदवार खा. विनायक राऊत, महिला आघाडी प्रमुख जानव्ही सावंत, डॉ. प्रवीण सावंत, सुजीत जाधव, नितिन वाळके तसेच मोठ्या संख्येने शिवसेनेचे सरपंच उपसरपंच उपस्थित होते.
राणेंना टोला
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील जनता अभ्यासू आहे. ते भावनेने काम करत नाहीत तर ते बुद्धिने काम करतात. त्यांनी एकाद्या उमेदवार नाकरले आणि तोच उमेदवार पुन्हा निवडून लढवित असल्यास त्याला जनता पुन्हा स्विकारत नाही असा टोलाही आमदार वैभव नाईक यांनी निलेश राणे यांना नाव न घेता लावला.