रत्नागिरी, (आरकेजी) :कुंभार्ली घाटातील चेक पोस्ट पोलिसांनी वाघाचे कातडे जप्त केले. पुण्यातून चिपळूणच्या दिशेने ते विक्रीसाठी आणले जात होते. या वाघाच्या कातडीची किंमत अंदाजे पाच लाख रुपये आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
शेवरोलेट गाडीतून वाघाचे कातडे आणण्यात येत असल्याची खबर रत्नागिरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कुंभार्ली घाटात नाकाबंदी केली गेली. गाडीच्या तपासणीत गोणपाटात गुंडाळले वाघाचे कातडे आढळून आले. मुळचा धनकवडी पुणे येथील असलेल्या दीपक पावसकर या चालकाला रत्नागिरी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.