मुंबई : टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये १५ पेक्षा अधिक नावाजलेले ब्रॅण्ड्स आहेत. परंतु यामध्ये एक सुद्धा मराठी ब्रॅण्ड नाही. आता ‘वा कॉर्पोरेशनने’ ही कसर भरून काढली आहे . वा कॉर्पोरेशन या कंपनीचे संचालक अमित आचरेकर यांनी त्यांच्या उत्पादनाची नवीन उत्पादन श्रेणी बाजारामध्ये आणली आहे. २०१६ मध्ये ‘वा कॉर्पोरेशन’ कंपनी सुरुवात झाली असून या कंपनीची वाढ झपाट्याने होत आहे.
होम फर्निशिंगसाठी लागणारी सारी उत्पादने वा कॉर्पोरेशन तयार करतात. त्यामध्ये उशांचे कव्हर्स, पडदे, गाद्यांचे कव्हर्स, टेबल लिनन, बेड शीट्स, हायजेनिक उशांचे कव्हर्स, वन टाईम युज उत्पादने यांचा समावेश आहे. २०३२ पर्यंत कंपनी १०० कोटींची उलाढाल करेल असा आशावाद देखील अमित आचरेकर व्यक्त करतात. होम फर्निशिंग मधलं एक मराठमोळं नाव म्हणून वा अल्पावधीतच लोकप्रिय होत आहे. मुंबईतील जवळपास सर्वच मॉल्स मध्ये ‘वा’ची उत्पादने मिळतात. ‘तुम्ही जर गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, मात्र गरीब म्हणून मेलात तर तुम्हीच दोषी आहात’, असं बिल गेट्सचं वाक्य आहे. अमित आचरेकरांनी हे वाक्य आचरणात आणून मराठी तरुणांना जणू एक संदेशच दिला आहे.