मुंबई, २५ एप्रिल २०२१: वी फाउंडर सर्कल (WFC) ह्या स्टार्ट अप गुंतवणुकीच्या प्लॅटफॉर्मने सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्ट अप्सना सीड फंड देण्याच्या आपल्या उद्दिष्टाला पुढे सुरू ठेवताना मासिक पाळीशी संबंधित जागरूक व सर्वंकष देखभालीवर कार्य करणा-या अवनी ह्या स्टार्ट अपमध्ये ७५ हजार यूएस डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. ह्या ब्रँडद्वारे मासिक पाळीच्या देखभाली संदर्भातील विविध उत्पादने दिली जातात ज्यामध्ये पुन: वापरता येणारे अवनी कापडी पॅडस, अवनी सेंद्रीय कॉटन पॅड आणि अवनी मेन्स्ट्रुअल कप्स ह्यांचा समावेश आहे.
७५ हजार यूएस डॉलर्सच्या सीड राउंडमध्ये उद्योजक व गुंतवणूकदार असलेले अमित त्यागी, तंत्रज्ञान सेवा उद्योगामधील वरिष्ठ अधिकारी असलेले, शिक्षण- तंत्रज्ञान, आरोग्य देखभाल व ग्राहक स्टार्टअपमधील गुंतवणूकदार असलेले श्रीकांत अय्यंगार अशा मुख्य गुंतवणूकदारांचा समावेश होता. अवनी उत्पादनाच्या विकासासाठी व उत्पादनाच्या लाईनच्या विस्तारासाठी ह्या निधींच्या वापराचे नियोजन केले आहे. विविध प्रत्यक्ष उपक्रमांद्वारे जागरूकता वाढवण्यासाठीसुद्धा निधीमधील एक भाग विशेष प्रकारे वापरण्याचे अवनीचे नियोजन आहे.
वी फाउंडर सर्कलचे सह संस्थापक व सीईओ श्री. नीरज त्यागी म्हणाले , ‘२०२४ पर्यंत महिलांच्या स्वच्छता उत्पादनांचे मार्केट हे ५८.६२ अब्ज रूपये इतके वाढेल अशी अपेक्षा आहे. अवनीसारख्या नावीन्यपूर्ण स्टार्टअप्सच्या सहभागासह नैसर्गिक पर्यायांची निवड करणा-या अनेक ग्राहक समोर येतील. ह्या प्रकारामध्ये अद्याप जास्त कोणी आलेले नाही आणि इथे इतकी स्पर्धा नाही. त्यामुळे इथे खूप मोठ्या संधी आहेत.’
अवनीच्या सह- संस्थापिका मिस. सुजाता पवार म्हणाल्या की, ‘आम्ही नैसर्गिक व पुन: वापरता येणा-या उत्पादनांचे पर्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत ज्यामुळे महिलांना प्लास्टीक व रसायनांवर आधारित उत्पादने वापरण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही. महिलांच्या उत्पादनांच्या बाजारपेठेमधील ८०% वाटा हा पॅडसच्या वर्चस्वाखाली असलेल्या स्थितीमध्ये आम्ही अँटीमायक्रोबायल पुन: वापरता येणारे व सेंद्रीय कॉटन सॅनिटरी पॅडसद्वारे सुरुवात केली. हळु हळु आम्ही मासिक पाळीशी संबंधित देखभालीच्या प्रकारातील विविध अन्य उत्पादने सुरू करणार आहोत. आत्तापर्यंत आम्ही ५००० पेक्षा अधिक महिलांना सेवा दिली आहे.