
मुंबई : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनकडून दरवर्षी 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. सध्या कोरोनाने जगभरात धुमाकुळ घातला आहे. लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे, यासाठी अनेक डॉक्टर कोरोनाविरोधात जिवाची पर्वा न करता लढा देत आहेत. डॉक्टरांचे मनोधैर्य वाढावे यासाठी कलाकार चेतन राऊत यांनी जागतिक आरोग्य दिनानिमित्त पुश पिनांचा वापर करत कोरोनाविरोधात लढणार्या डॉक्टरांची कलाकृती साकारली आहे.
24 बाय 30 इंच असे आकारमान असणारी ही कलाकृती राऊत यांनी स्वत:च्या घरीच ही साकारली आहे. 6 रंगछटा असलेल्या 4266 पुश पिनांचा वापर त्यासाठी केला गेला आहे.
” दिवस रात्र कोरोना विरुद्ध लढणार्या डॉक्टरांच्या कार्याला सलाम केलाच पाहिजे,” असे राऊत यांनी सांगितले. राऊत यांनी याधीही अनेक कलाकृती साकारल्या आहेत.
















