मुंबई, (निसार अली) : उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडून बॉलीवूड तारका उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
आज उर्मिला मातोंडकर यांनी नवी दिल्लीत काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला. मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा, संजय निरूपम, तसेच मालाड पश्चिम चे आमदार अस्लम शेख आदी यावेळी उपस्थित होते. उर्मिला यांचे वडील हे राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते आहेत. उर्मिला या उत्तर मुंबईतून निवडणूक लढवणार या बातमीने पुरोगामी आणि समाजवादी तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण झाला असून विरोधी पक्षात चिंता वाढली आहे.
उर्मिला मातोंडकर काँग्रेस पक्षात आल्याने काँग्रेसला फायदा होणार आह. त्यांच्या उमेदवारीबाबत पक्ष ठरवेल. उत्तर मुंबईत त्यांचे स्वागत आहे. त्यांची पार्श्व ₹भूमी ही समाजवादी विचारांची आहे. – अस्लम शेख, काँग्रेस आमदार.
उर्मिला यांचे वडील राष्ट्र सेवा दलातील असल्याने तिच्यावर ही समाजवादी विचारांचा पगडा असणार आणि ती एक श्रेष्ठ अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे.
– पूर्णांद सामंत, समाजवादी कार्यकर्ते