सेंट पीटर्सबर्ग : रशियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सेंट पीटर्सबर्ग इथल्या दास्तान गुंजेकोईनेई या बौद्ध मठाला भेट दिली. यावेळी पंतप्रधानांनी या मंदिराचे मुख्य धर्मगुरु जाम्पा डोनर, बुडा बादमायेएव्ह यांना ‘उर्गा कांजुर’ या धर्मग्रंथाचे १०० खंड भेट दिले.
तिबेटन कांजुर ची उर्गा आवृत्ती १९५५ पर्यंत अप्रकाशित होती. १९५५ साली प्राध्यापक रघु वीरा यांनी त्याचे १०४ खंड भारतात आणले. मंगोलियाच्या तेव्हाच्या पंतप्रधानांनी त्यांना हे ग्रंथ भेट दिले होते.
१९०८ ते १९२० या काळात हे कांजुर पुन्हा लिहून, संपादित करुन त्याची आवृत्ती काढण्यात आली.