मुंबई : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात उर्दू भाषेतील ‘इन्कलाब जिंदाबाद’ या नाऱ्यानेच अनेक स्वातंत्र्य सैनिकांना देशासाठी प्राणाची आहुती देण्यास प्रेरित केले. त्यामुळे कुठल्यातरी देशाने उर्दूला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला म्हणून आपण उर्दूकडे पाठ फिरविण्याचं काहीच कारण नाही. उर्दू ही या देशाच्या मातीतील भाषा आहे. त्यामुळे उर्दू भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. भविष्यातही त्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले जाणार आहेत, असे अल्पसंख्याक विकास मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.
उर्दू भाषेमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी मार्फत सन २०१५ व सन २०१६ वर्षाकरिता दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात श्री.तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री दिलीप कांबळे, उर्दू अकादमीचे अबू आझमी, अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
उर्दू अकादमीतर्फे दिले जाणारे हे पुरस्कार या भाषेतील सर्वोच्च पुरस्कार आहेत. त्यामुळे या पुरस्कारांचा उचित सन्मान होण्याच्या दृष्टीने पुढील वर्षीपासून हा पुरस्कार वितरण सोहळा राजभवनात घेण्यात यावा, असेही तावडे यांनी यावेळी सुचविले. आपल्या कारकिर्दीत सर्व प्रकारच्या शासकीय पुरस्कारांच्या निवडीत पारदर्शकता आणण्यासाठी आपण प्रयत्न केल्याचे देखील तावडेंनी सांगितले. महाराष्ट्रातील जनता ज्यावेळी उर्दूला मराठी आणि हिंदीप्रमाणे स्वीकारेल त्यावेळीच अल्पसंख्याक मंत्री म्हणून आपली कारकीर्द यशस्वी ठरेल, असेही तावडे यावेळी म्हणाले.
या समारंभात सन २०१५ करिता ५९ व सन २०१६ करिता ५७ अशा एकूण ११६ साहित्यिक/लेखक/कवी/पत्रकार/शिक्
उर्दू साहित्य अकादमीमार्फत उर्दू भाषेमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरविण्यात आलेल्या पारितोषिके विजेत्यांची यादी
अ.क्र
पारितोषिकाचे नाव
२०१५ करिता
२०१६ करिता
मिर्झा गालिब जीवन गौरव पुरस्कार
श्री. काझी अब्दुस सत्तार, अलीगढ
श्री. फुजैल जाफरी, मुंबई
वली दखनी राज्य पुरस्कार
श्री. काझी मुश्ताक अहमद, पुणे
श्री. वकील नजीब, नागपूर.
नवोदित साहित्यक पुरस्कार
१.श्री. याहया जमील,अमरावती
1.श्रीमती असवद गौहर, औरंगाबाद
२.श्री. फरहान हनिफ वारसी, मुंबई
2.श्री रशीद अशरफ, मुंबई
ले-आऊंट डिजाईनिंग पुरस्कार
श्री. नाजीर नोमान सिघ्दीकी माहनामा शाईर मुंबई
श्री. इश्तीयाक अहमद, उर्दू सर्कल की दुनिया,मालेगांव
उर्दू पत्रकारिता पुरस्कार
१.श्री. सय्यद मोहम्मद अब्बास, दै. उर्दू न्यूज, मुंबई
२.श्री. अन्सारी असगर जमील, संपादक,उर्दू मेला, नागपूर.
३.श्री. काझी मखदूम, दै. तामिर, बीड
४.श्री. मुर्शरफ शमसी, ठाणे सा. पहिली खबर, मीरा रोड ठाणे.
१.श्री असीम जलाल, दै इन्किलाब मुंबई
२.श्री रफीक अहमद मुश्ताक अहमद अन्सारी (खयाल असर मालेगांवी मालेगांव)
३.श्री. मुन्शी मोहम्मद ईकबाल सफदर अली, दै. हिन्दुस्तान मुंबई
४.श्री.मेराज अन्वर दै. राष्ट्रीय सहारा मुंबई.
विशेष पुरस्कार
१.डॉ. ए. आर. उन्द्रे, जि. रायगड
२.श्री मोहम्मद अली पाटणकर, मुंबई
३.श्री अस्लम फकीह, भिंवडी, ठाणे
४.श्री सय्यद फोरोज अशरफ, मुंबई
५.श्री अब्दुल्ला हसन चौधरी,अहमदनगर
६.श्री.मोहसीन अहमद बशीर अहमद,औरंगाबाद
७.श्री. अब्दुल रऊफ इमाम खान, नवी मुंबई
८.श्री. आय. जी. शेख, कोल्हापूर
९.श्री. राजेन्द्र जोशी, पुणे
१०.इंजिनियर श्री. हफीझ दुर्रानी जालना
>>>>>>>>>>>>>
१. श्री. मुजतबा फारूकी खुलताबाद
२. श्री. हारून रखानगी, मुंबई
३.श्री नजिरूददीन, नागपूर
४.श्री. जमील गुलरेज, मुंबई
५.श्री. प्रकाश पाथरे, मुंबई
६.श्रीमती सबीहा बेगम खान, बीड
७.श्री. अब्दुल करीम अत्तार पुणे
८.श्री. अन्सारी मुशीर अहमद, मुंबई
९.श्री. अब्दुल वहीद, औरंगाबाद
१०.श्री. ईक्बाल नियाजी, मुंबई
७ शिक्षण सेवा पुरस्कार
(अ) विद्यापीठ पुरस्कार
डॉ कीर्ती मालिनी विठठलराव जावळे औरंगाबाद
——-
(ब) प्राध्यापक पदवी महाविद्यालय पुरस्कार
१.डॉ. सरोशा काझी, जाकीर हुसैन कॉलेज, नागपूर
२.डॉ. मुसर्रत साहेब अली, मुंबईृ
३.डॉ. शर्फुनिहार, औरंगाबाद
१.डॉ. अकोला गौस, अंबाजोगाई, बीड
२.श्री. दानिश गणी, रत्नागिरी
३.श्रीमती शाहिदा मुनाफ, बुलढाणा
(क) स्कूल / ज्युनियर कॉलेज पुरस्कार
१.श्री. मोहम्मद दानिश मोहम्मद जियाऊलहक, यवतमाळ
२.डॉ. मोहम्मद खलील सिद्दीकी, लातूर
३.श्री. कलिम अहमद मोहम्मद युनूस,नागपूर
४.श्री.अबुल बारकात, भिवंडी,ठाणे
५.श्री. एजाज मंजूर आलम, सोलापूर
६.श्रीमती शमा तारापुरवाला, मुंबई
७.श्री मोहम्मद ईमामुददीन हनीफुदीन,नांदेड
८.डॉ कलिम जिया, ठाणे
९.श्री. ईख्लाक अहमद शाह, जळगांव
१०.श्रीमती अजरा नसरीन अब्दुल हकीम खान, मुंबई
११.श्री. सय्यद जाहीद अली, ठाणे
१२.श्रीमती सफिया नसरूददीन अन्कोळवी, पुणे
१३.डॉ. गुलाम साबीर गुलाम मुस्तफा,अकोला
१४.श्री इम्रान दाऊद कापडी, रत्नागिरी
१५. श्रीमती आयेशा मोहम्मद अमीन,मुंबई
1) श्री.सिद्दीकी मोहम्मद इरफान, बीड
2) श्रीमती सादीका बेगम अब्दुल सत्तार, गडचिरोली
3) श्री. शेख मोहम्मद शरफुद्दीन,औरंगाबाद
4) श्रीमती नसरीन असलम शेख, ठाणे
5) श्री.मोहम्मद शरफुद्दीन सौदागर,गडचिरोली
6) श्री.अमिन मोहिमतुले, मुंबई
7) श्री.आसिफ इक्बाल, सोलापूर
8) श्री.मोहम्मद ताहीर शाह, मुंबई
9) श्रीमती रशीदा अंन्जुम, नागपूर
10) डॉ.अब्दुल अजीज इरफान,औरंगाबाद
11) श्री. मोमीन सिराज अहमद एम सईद, रत्नागिरी
12) डॉ.अतीक अहमद तैय्यब शाह,अकोला
13) श्रीमती सायका समी मोहम्मद अकबर, यवतमाळ
14) श्रीमती फजीला अब्दुल मतीन,मुंबईृ
15) श्री.नसीरुद्दीन अन्सार, अकोला