डहाणू : सरकारने उपाययोजना करून तात्काळ मच्छिमार वर्गाला विशेष मदत देण्यात करावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मत्स्यव्यवसाय विकास मंत्री अस्लम शेख यांच्या कडे ईमेल द्वारे केली आहे.
यावेळी आमदार निकोले म्हणाले की, कोरोनाच्या पाश्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यास समुद्र किनारा लाभला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये मच्छिमार वर्ग अडचणीत आले आहेत. काही बोटी सुरू आहेत तर काही बंद आहेत. लॉकडाऊन मुळे मासे विकले जात नाही आहेत. तर 15 मे ते 15 ऑगस्ट पर्यंत पावसाळ्यामुळे मासेमारी बंद करण्यात येते आणि बोटी किनाऱ्यावर आणल्या जातात. अर्थात या सर्व घटनेत मच्छिमार वर्ग प्रचंड प्रमाणात अडचणीत आला असून नुकसानीत आहे. मच्छिमार वर्गातील पुरुष मंडळी समुद्रात 7 ते 8 दिवसासाठी जात असतात आणि मासेमारी करून आणत असतात. ते मासे महिला मंडळी मासेंचे वर्गीकरण करून ओले आणि सुके मासे करून विकतात. त्यावर वर्षभर मच्छिमार वर्गाच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह होत असते. तसेच काही मासे सोसायटी ला विकत असतात. तर अनेक व्यापारी या मच्छिमार वर्गाकडून मासे विकत घेऊन जात असतात. त्यातील काही व्यापारींनी बोली केल्या प्रमाणे पैसे दिले आहेत. तर काहींनी दिलेले नाहीत. असे कळत आहेत. त्यामुळे मच्छिमार वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. त्या अनुषंगाने सरकारने उपाययोजना करून तात्काळ मच्छिमार वर्गाला विशेष मदत करावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी केली असून याबाबत मुख्यमंत्री सचिवालय यांच्या कडून ” आपला “ईमेल” मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त झाला असून तो पुढील कार्यवाहीसाठी संबंधीत विभागास पाठविण्यात आला आहे. ” असे उत्तर प्राप्त झाले आहे.
यावेळी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चे आमदार काॅ. विनोद निकोले, किसान सभेचे काॅ. चंद्रकांत घोरखना, कॉ. धनेश अक्रे, कॉ. रशिद पेंटर, कॉ. महेंद्र दवणे आदी उपस्थित होते.