पहा एम.एक्स.प्लेयरच्या ५ दर्जेदार कलाकृती विनामूल्य
सेल्फ क्वॉरन्टाईनच्या कित्येक आठवड्यानंतर लॉकडाऊन संपलय मात्र मनोरंजन अजून संपलेलं नाही. जसजसा महाराष्ट्र हळूहळू पुन्हा एकदा जोमाने सुरू होत आहे त्याचप्रमाणे भारताचा नंबर १ ओटीटी अँप एम एक्स प्लेयरवरील विनामूल्य मनोरंजनाच्या दुनियेत तुम्ही सुद्धा सामील होत रहा. उलगडून पाहा तुमच्या आवडत्या मराठी सीरिज. भविष्याची पान उलघडणाऱ्या सर्वांच्या लाडक्या स्वप्नील जोशीची ‘समांतर’, मुंबई पोलिसांचे आयुष्य उलघडणारी पांडू, अनुजा साठेसोबत अनेक मोठ्या कलाकारांनी घडलेली ‘ एक थी बेगम’ मधून अनुभवा एका साध्या महिलेचा थ्रिलर प्रवास तर खऱ्या आयुष्यात एकमेकांचे जोडीदार असलेले उमेश कामत आणि प्रिया बापट सोबत ‘आणि काय हवं १ आणि २’ मधून व्हा त्यांच्या वैवाहिक जीवनाचा भाग. नुकतीच प्रदर्शित झालेली मराठीचा सुपरस्टार प्रियदर्शन जाधवची नवीन वेब सीरिज ‘भुताटलेला’ मधून अनुभवा एक रोमांचकारी भुताटकी अनुभव.
ट्रेलर लिंक : bit.ly/UnlockMarathiShows
तुमच्या आवडत्या मराठी एम एक्स प्लेयर वरील ५ वेब सीरिज विषयी जाणून घ्या –
“समांतर” – कुमार महाजन याच्या आयुष्याची गोष्ट सांगणारी कथा म्हणजे ‘समांतर’, आपला भविष्य काळ हा सुदर्शन चक्रपाणी या माणसाचा भूतकाळ आहे हे कळल्यावर त्याच आयुष्य बदलून ‘कुमार’च आयुष्य एक वेगळंच वळण घेत. स्वप्नील जोशीने समांतर च्या निमित्ताने वेब दुनियेत पदार्पण करत धकाधकीचे जीवन जगणारा ज्याच्या आयुष्यात काहीच नीट चालू नाही असा सामान्य ‘कुमार महाजन’ साकारलेला आहे. स्वतःच्या घरच्या साध्या गरजा न पूर्ण करू शकणारा, कामावरून काढून टाकण्यात आलेला त्यात अगदी छोटी गोष्ट सुद्धा नीट न करू शकणारा हा कुमार महाजन आहे. गुणी आणि उत्तम अभिनेत्री ‘तेजस्विनी पंडित’ स्वप्नीलच्या बायकोच्या भूमिकेत या ९ भागाच्या सीरिज मध्ये दिसते तर ही सतीश राजवाडे यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे.
“आणि काय हवं” १ आणि २ पहिल्यांदा एकत्र बनवलेलं जेवण, पहिला एकत्र साजरा केलेला सण, पहिलं मोठं भांडण, पहिल्या गाडीच डाऊन पेमेंट आणि पहिल्या विकत घेतलेल्या घराचा आनंद हा जुई (प्रिया बापट) आणि साकेतच्या (उमेश कामत) या पहिल्यावहिल्या गोड आनंदाचे आपण साक्षीदार झालो ते आणि काय हवं सीझन १ मध्ये. या सीरिजच्या सीझन २ मधून उलघडणार आहे त्यांच्या वैवाहिक जीवनाचा प्रवास आणि आपण अनुभवणार आहोत त्याचं दिवसेंदिवस घट्ट होत जाणार नात. वरून नार्वेकर याने दिग्दर्शित केलेली ही सीरिज छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधायला शिकवते.
भूताटलेला – शिवाजी लोटन दिग्दर्शित ५ भागांची हि मालिका रायबा (प्रियदर्शन जाधव) यांचे जीवन आणि शिवानी (सुरभी हांडे) सोबत लग्नाच्या आधी त्यांच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टींची एक रंजक कथा आहे. रायबा त्याच्या हळदीच्या दिवशी, त्याच्या आईने दिलेली कट्यार सोबत बाळगणे विसरतो आणि तेव्हाच अचानक त्याला त्याच्या मागे कोणी तरी सतत असण्याचा भास होऊ लागतो. योगेश सिरसाट, सुनील होळकर आणि सायली पाटील हे कलाकार ही या सीरिज मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
एक थी बेगम – १९८० च्या काळात मुंबई ही अट्टल गुन्हेगाराची राजधानी बनली होती. याच काळात अश्रफ भाटकर (अनुजा साठे) हिच्या आयुष्यामध्ये झालेल्या विस्मयकारक बदलांची कथा म्हणज एमएक्स ओरिजिनल ‘एक थी बेगम’ – अश्रफचा नवरा झहीर (अंकित मोहन) याच्या मृत्यूसाठी शहरातील सर्वात मोठा डॉन मकसूद (अजय गेही) जबाबदार आहे हे जेव्हा तिला कळत तेव्हा तीच आयुष्य बदलून जात. सत्य घटनेवरून प्रेरित होऊन, एमएक्स प्लेअर प्रेक्षकांसाठी अश्रफ बेगम उर्फ सपनाची कथा घेऊन आले जी तिच्या नवऱ्याच्या खुनाचा सूड घेण्यासाठी तिचे पूर्ण आयुष्यपणाला लावते. सचिन दरेकर दिग्दर्शित या सूड कथेत चिन्मय मांडलेकर, राजेंद्र शिसाटकर, रेशम, अभिजीत चव्हाण, प्रदीप डोईफोडे, विठ्ठल काळे, नाझर खान, विजय निकम, अनिल नगरकर, सुचित जाधव, राजू आठवले आणि संतोष जुवेकर यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
पांडू – ही मालिका मुंबई पोलिसांच्या जीवनावर आधारित आहे – दिवसेंदिवस येणाऱ्या नवनवीन परिस्थिती, त्यांना भेडसावणाऱ्या समस्या तसेच त्यांच्या नोकरीतील गुंतागुंत याचे चित्रण या सीरिजत केले आहे. ही सीरिज आपल्यास त्यांच्या आयुष्याचे वास्तव आणि विनोद या दोघांसोबत रोलर-कोस्टर राइडवर घेऊन जाईल. या सीरिजमध्ये सुहास सिरसाट, दीपक शिर्के आणि तृप्ती खामकर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.