मुंबई : शुक्रवार दि.२५ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वा. टागोर नगर येथे साजिद अन्सारी व अयुबभाई यांच्या पुढाकाराने तसेच युनायटेड -वे या सामाजिक संस्थेच्या वतीने रिक्षा चालकांसाठी जीवन दूत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेत युनायटेड वे च्या पदाधिकारी व डॉक्टर प्रतिक यांनी गंभीर व किरकोळ रस्ते
अपघाताच्या वेळी जखमींवर प्रथमोपचार कसे करावे याबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक दाखवली.
याप्रसंगी वाहतूक पोलीस निरीक्षक श्री. हुसेन जतकरसाहेब यांनी रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन केले. सदरवेळी दिशा वेल्फेअर ग्रुपचे अध्यक्ष दिनेश बैरीशेट्टी, सेक्रेटरी प्रकाश पालव व पदाधिकारी खस निमंत्रित म्हणून उपस्थित होते.३५ ते४०
रिक्षा चालकांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. सर्वांना प्रमाणपत्र, ओळखपत्र,स्पेशल कीट वाटप करण्यात आले.