नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणखी 12,660 मेट्रिक टन कांदा खरेदी केला असून, 27 डिसेंबर 2019 पासून तो भारतात यायला सुरुवात होईल. याबरोबरच एकूण कांद्याची आयात सुमारे 30,000 मेट्रिक टनांवर पोहोचली आहे. अतिरिक्त 15,000 मेट्रिक टन (5,000 मेट्रिक टन प्रमाणे 3 नव्या निविदा) कांद्यासाठी नव्या निविदा जारी करण्याचे निर्देशही ग्राहक हित विभागाने एमएमटीसीला आज दिले.