मुंबई, ११ जून २०२०: युनियन बँक ऑफ इंडियाने आपल्या कर्जांवरील व्याजदरात पुन्हा एकदा कपात घोषित केली आहे. एमसीएलआर (मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट्स) आधारित कर्जांवरील व्याजदर बँकेने ०.१० टक्क्यांनी (१० बेसिस पॉइंट्स) घटवले आहेत. यामुळे एमसीएलआर आधारित एक दिवसाच्या मुदतीच्या कर्जाचा व्याजदर आता ७.०५ टक्के झाला आहे. एक महिना, तीन महिने व सहा महिने मुदतीच्या कर्जांवरील नवे व्याजदर अनुक्रमे ७.१५, ७.३० व ७.४५ टक्के असतील. एक वर्षे मुदतीच्या ग्राहक कर्जांसाठी आता ७.६० टक्के व्याजदर असेल. नवे दर ११ जूनपासून लागू करण्यात आल्याचे बँकेने सांगितले आहे. जुलै २०१९ पासून बँकेने घोषित दरात ही सलग १२ वी कपात आहे.
यापूर्वी याच महिन्यात युनियन बँक ऑफ इंडियाने एक्स्टर्नल बेंचमार्क लिंक्ड लेंडिंग रेट (ईबीएलआर) ला ४० बेसिस पॉइंट्सनी कमी केला होता. म्हणजेच ७.२० टक्क्यांनी कपात करून ६.८० टक्के केला होता.