(लेखक: प्रथमेश माल्या, गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष, एंजल ब्रोकिंग लिमिटेड)
मागील आठवड्यात सोने, कच्चे तेल आणि बेस मेटलने लाल रंगात व्यापार केल्याने कमोडिटीजची कामगिरी कमकुवत दिसून आली तर तांब्याने किरकोळ वाढ दर्शवली.
सोने: मागील आठवड्यात, अमेरिकन डॉलरमध्ये सुधारणा झाल्याने तसेच आर्थिक सुधारणेची आशा कमी झाल्याने सेफ हेवन समजल्या जाणाऱ्या स्पॉट गोल्डचे दर १.६ नी घसरले. दोन वर्षातील निचांकी पातळीवर गेल्यानंतर अमेरिकन डॉलरच्या मूल्यात सुधारणा झाली. त्यामुळे सोन्यातही घसरण झाली.
अमेरिकेत तयार झालेल्या वस्तूंच्या नवी ऑर्डरमध्ये वाढ झाली तसेच अमेरिकी फॅक्टरीतील कामकाज वाढल्याने संभाव्य आर्थिक सुधारणेच्या आशा वाढल्या. इन्स्टिट्यूट फॉर सप्लाय मॅनेजमेंट (आयएसएम) च्या अहवालानुसार, यूएस फॅक्टरी आकडेवारी ऑगस्ट महिन्यात ५६ वर पोहोचली. जुलै २०२० मध्ये ती ५४.२ एवढी होती. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांनी आगामी महिन्यांत अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी दीर्घकालीन कमी व्याजदराचे संकेत दिले. त्यामुळे पिवळ्या धातूचे नुकसान मर्यादित राहिले.
कच्चे तेल: मागील आठवड्यात, डब्ल्यूटीआय कच्च्या तेलात ११ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली. कारण साथीने मागणीतील चिंता वाढवल्या व आर्थिक सुधारणेचा वेग मंदावल्याने किंमतीही तणावाखाली आल्या. एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशन (इआयए) च्या डेटानुसार, अमेरिकेतील पेट्रोल आणि इतर तेल उत्पादनांची मागणी मागील आठवड्यात घटली. साथीच्या आजाराच्या व्यापक परिणामामुळे कच्च्या तेलाप्रती दृष्टीकोनावर परिणाम झाला. तसेच तेल बाजाराला आर्थिक घसरणीतून सुधारण्यास संघर्ष करावा लागतच आहे. अमेरिकी तेलसाठ्यात २८ ऑगस्ट २०२० रोजी संपलेल्या आठवड्यात ९.४ दशलक्ष बॅरलची घसरण होऊनही तेलाच्या किंमतीत ही घट दिसून आली.
तथापि, अमेरिका-चीनच्या उत्पादन निर्मितीत वाढ झाली तसेच येत्या काही महिन्यात इराककडून अतिरिक्त उत्पादन कपात अपेक्षेने कच्च्या तेलाचे नुकसान मर्यादित राहिले.
बेस मेटल्स: अमेरिकन डॉलरमध्ये सुधारणा आणि अमेरिका-चीनमधील वाढत्या तणावाने किमतींवर परिणाम होऊन मागील आठवड्यात लंडन मेटल एक्सचेंजवर बेस मेटल लाल रंगात दिसून आले. यासोबतच, अमेरिकी पगाराच्या आकडेवारीत घसरण सलग दुसऱ्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट २०२० मध्ये घटली. त्यामुळे जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतील कमकुवत कामगार शक्तीचे संकेत दिसून आल. परिणामी, औद्योगिक धातूंच्या किंमतीही घसरल्या.
तथापि, चीनच्या पायाभूत सुविधाकेंद्रीत मदत पॅकेजमुळे तसेच उत्पादन व सेवा क्षेत्रातील सुधारणेमुळे औद्योगिक धातूंचे नुकसान मर्यादित राहिले. चीनच्या नैऋत्येकडील (नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सची आकडेवारी) भयंकर पुरामुळे जुलै २०२० मधील उत्पादन परचेस मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) ५१.१ वरून ऑगस्ट २०२० मध्ये ५१ पर्यंत आले.
तांबे: लंडन मेटल एक्सचेंजमधील तेलसाठ्यात ८२,४५० टनांपर्यंत घसरण झाली. ही १५ वर्षातील सर्वात मोठी घसरण ठरली. त्यामुळे एलएमई तांब्याचे दर ०.६ टक्क्यांनी वाढले. तथापि, चिली आणि पेरुमधील पुरवठ्याची चिंता कमी झाल्याने तांब्याच्या किंमती आणखी ताणल्या गेल्या.