मुंबई : प्रमुख राजकीय पक्षांनी अद्यापही आपली उमेदवार यादी जाहीर न केल्याने तीन दिवसात फक्त १४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास २७ जानेवारीपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी एकही अर्ज भरला गेला नाही. दुसऱ्या दिवशी शनिवारी ५ आणि तिसऱ्या दिवशी रविवारी ९ अर्ज दाखल झाले. ३ फेब्रुवारी हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
मुंबई महापालिकेसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होत आहे. रविवारी दाखल झालेल्या ९ अर्जांपैकी प्रभाग क्रमांक १२ मधून १, ७९ मधून १, ८१ मधून १ , ८७ मधून १, प्रभाग क्रमांक १०६ मध्ये १, १३३ मधून २ तर प्रभाग क्रमांक १७६ मधून१,१७९ मध्ये १ असे अर्ज दाखल झाले, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.