मुंबई, (निसार अली), 29 मे : मुलांना शिक्षण आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणार्या उल्का फाऊंडेशनच्या अध्यक्षा उल्का नायर यांना राष्ट्रीय महिला आयोगाकडून महिलांच्या अधिकारांकरिता केलेल्या कार्यसाठी संकल्प हे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. अनेक सामाजिक संस्थांमार्फत मुले व महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणार्या उल्का नायर या मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांना अमली पदार्थांच्या व्यसनापासून मुक्त करण्यासाठी बर्याच कालावधीपासून काम करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. नायर यांच्या या समाजकार्यात त्यांचा पती चंद्रशेखर नायर यांची मोलाची साथ असल्याचे त्या सांगतात. सन्मान झाल्याबद्दल उल्का नायर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.