मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष उदय सावंत यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने मिरारोड येथील एका खासगी रूग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. आज सायंकाळी सहा वाजता टागोर नगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. शिवसेना आमदार सुनील राऊत, शिवसेना नेते लीलाधर डाके, नगरसेवक उपेंद्र सावंत, शिवसेना उपविभाग प्रमुख चंद्रशेखर जाधव, मनसेचे नेते शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई, शाखाध्यक्ष जयंत दांडेकर, काँग्रेसचे राहुल वाघधरे, मनविसे उपविभाग अध्यक्ष विशाल कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सावंत हे भारतीय विद्यार्थी सेनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत होते.
“लोकांसाठी अहोरात्र झटणारा कार्यकर्ता अशीच सावंत यांची ओळख होती, “अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते शिशिर शिंदे यांनी दिली. सर्वच पक्षात त्यांचे उत्तम संबंध होते. कार्यकर्त्यांना ते त्वरित मदत करत. असे आमदार सुनील राऊत म्हणाले.