मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उद्या सकाळी उच्च न्यायालयात बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येणार आहे. न्यायालयातील मुख्य न्यायमूर्तींसह सर्व माननीय न्यायमुर्ती यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती उच्च न्यायालयातील संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रवी पवार यांनी दिली.
उच्च न्यायालयातील दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक 46 येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेला मुख्य न्यायमूर्तीच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येईल, असे पवार म्हणाले.