मुंबई, दि.२१ (प्रतिनिधी) – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व खासदार, आमदार यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण देण्यात आले होते. वांद्रे येथील ताज लँन्डसन हॉटेल मध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेना पक्षाचे सर्व खासदार, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तयारीसाठी या स्नेहभोजनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
वर्धापन दिनाच्या दुस-या दिवशी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सर्व खासदार, आमदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले होते. राज्यात लवकरच स्थानिक संस्थेच्या निवडणुका होणार असल्याने त्याच्या तयारीसाठी उध्दव ठाकरे यांनी स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले होते. सर्व आमदार, खासदार यांनी आपल्या मतदार संघात कार्यकर्त्यांशी संवाद वाढवावा, जास्तीत जास्त नगरसेवक निवडुण आणण्यासाठी आपल्या मतदार संघात प्रयत्न करावा, यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला सुरवात करावी. त्याची सुरवात झाली असून त्यानिमित्त शिवसेनेच्या या स्नेहभोजनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.