पुणे : लेखक उदय पिंगळे यांच्या ‘अर्थसाक्षरतेच्या दिशेने’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी पुणे येथे झाले. 1 फेब्रुवारी 2019 ते 5 एप्रिल 2019 या कालावधीत पिंगळे यांच्या प्रसिद्ध झालेल्या लेखांचे संकलन या पुस्तकात प्रसिद्ध झाले आहे. समाजात अर्थसाक्षरता यावी, या उद्देशाने पिंगळे यांनी मार्गदर्शनपर लेखन केले आहे. नवी अर्थक्रांती या पब्लिकेशन्सने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
नवी अर्थक्रांतीच्या चवथ्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित ‘लॉन्च युवर स्टार्टअप’ या विशेष कार्यक्रमापूर्वी ललिता कुलकर्णी, विश्वस्त मुंबई ग्राहक पंचायत यांच्या हस्ते काँफेरिया हॉल, सिनेट बिझनेस सेंटर, एरंडवणे, पुणे येथे पुस्तक प्रकाशन झाले.
“गुंतवणूक, म्युच्युअल फंड, शेअरबाजार, कर, ग्राहक संरक्षण, विविध सरकारी योजना यावरील विषयांचा पुस्तकात समावेश आहे.
विविध लेखांचे विषयवार वर्गीकरण करून नवी अर्थक्रांतीने निवडक लेख पुन्हा प्रकाशित केले आणि त्याचे पुस्तकही छापले याबद्दल सर्वांचा ऋणी आहे. राम खुस्पे आणि त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. मला प्रोत्साहन देणाऱ्या अशा माझ्या संस्थेच्या विश्वस्त ललिताताई कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशन होतंय याचा विशेष आनंद आहे,” असे मनोगत उदय पिंगळे यांनी व्यक्त केले.