नवी दिल्ली : नेहमीच्या वातानुकूलन यंत्रणेपेक्षा पाच पटीने कमी प्रमाणात पर्यावरणावर प्रभाव पाडणाऱ्या निवासी शीत तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना देण्यासाठी ग्लोबल कुलिंग पुरस्काराची घोषणा आज ग्लोबल कुलिंग इनोव्हेशन शिखर परिषदेत करण्यात आली.
यात विजेता ठरणारे तंत्रज्ञान 2050 सालापर्यंत कार्बन उत्सर्जन 100 गिगाटनपर्यंत कमी करू शकेल तसेच 2100 सालापर्यंत तापमानात 0.5 अंश सेल्सिअसपर्यंत घट करेल.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज या परिषदेचे उद्घाटन केले. वाढत्या उष्ण तापमानामुळे पर्यावरणस्नेही शीत तंत्रज्ञानावर सरकार भर देत असल्याचे ते म्हणाले.